Old Age Pension Yojana| वृद्धावस्था पेंशन योजना |

Old Age Pension Yojana: गेल्या काही दिवसांपासून जुन्या पेन्शन योजनेवरून काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसत आहे. काही केंद्रशासित राज्यांमध्ये निवडणूक होऊन हिमाचल प्रदेश मध्ये काँग्रेसने जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी मोठी भूमिका घेतलेली आहे.

केंद्रामध्ये असलेल्या मोदी सरकारने ऑल पेन्शन योजनेबाबत आज संसदेत लोकसभे मधून मोठी घोषणा केलेली आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत त्यांनी कुठलाही विचार केला नसल्याचे मोदी सरकारकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे.

आता काही राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत घोषणा करण्यात आल्यानंतर केंद्र सरकारने आपली भूमिका लोकसभेत स्पष्ट केलेली आहे. वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी  असउद्दीन ओवेसी यांना लेखी उत्तर पाठवलेला आहे की त्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्यास स्पष्ट करणे नकार दिलेला आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत सरकारचा कुठलाही विचार नाही असे त्यांनी त्यांच्या लेखांमध्ये स्पष्ट केलेले आहे.

डॉक्टर भागवत कराड यांनी सांगितलेले आहे की बऱ्याच राज्यांमध्ये अनेक राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आपल्या पातळीवर नोटिफिकेशन हे पाठवण्यात आलेले आहेत. आता अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकार आपली इच्छा स्पष्ट करू शकते की, एनपीएससीचे पैसे परत करण्याची कुठल्या प्रकारची तरतूद नाही, असे भागवत कराड यांनी सांगितलेले आहे.                            गेल्या काही दिवसांमध्ये छत्तीसगड, झारखंड, राजस्थान आणि पंजाब या राज्यातील सरकारने कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करण्याची घोषणा केली आहे, या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment